शिंदे उमेदवारांना १० कोटी देणार ?

मुंबई महानगरपालिकेच्या बजेटवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुंबई महापालिकेचे बजेट तब्बल दहा हजार कोटींचे असून, प्रत्येक उमेदवाराला दहा कोटी रुपये देण्याची तयारी असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.


“ही माहिती पक्की आहे,” असे ठामपणे सांगत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आर्थिक ताकदीच्या जोरावर राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


दरम्यान, संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप–प्रत्यारोपांना वेग आला आहे. यावर आता सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

रात्री शांत झोप हवी असल्यास करा हा उपाय.

शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला एक लाखाचा बक्षीस.

शनि देवाला तेल वाहण्यामागचे मूळ कारण जाणून घ्या.