आता टोलनाक्यावर थांबायची गरज नाही.
देशभरात लवकरच AI स्मार्ट टोल सिस्टीम कार्यान्वित
देशभरात लवकरच AI आधारित स्मार्ट टोल सिस्टीम सुरू होणार आहे. या नव्या प्रणालीमुळे वाहनचालकांना टोल नाक्यावर थांबण्याची गरज भासणार नाही. गाडी चालू अवस्थेत असतानाच टोलची रक्कम आपोआप खात्यातून वजा केली जाईल.
या स्मार्ट सिस्टीममध्ये कॅमेरे, सेन्सर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. वाहनाचा नंबर ओळखून, फास्टॅग किंवा लिंक केलेल्या खात्यातून थेट टोल कट केला जाणार आहे.
यामुळे टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी होणार, वेळेची बचत होणार असून इंधनाचाही अपव्यय टळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लवकरच ही AI स्मार्ट टोल सिस्टीम देशातील प्रमुख महामार्गांवर टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे.

Comments
Post a Comment