२५ वर्षाची सत्ता अखेर शिवसेनेनं गमावले भगूर.
नाशिक जिल्ह्यातील भगूर नगरपरिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे.
भगूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार
प्रेरणा बलकवडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
या निकालामुळे गेल्या जवळपास २५ ते २७ वर्षांपासून सत्ता राखून असलेल्या
एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
भगूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता,
मात्र या निवडणुकीत मतदारांनी बदलाचा कौल दिला आहे.
या विजयामुळे
➡️ राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ मिळाले असून
➡️ स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे.
भगूर नगरपरिषद निकालाकडे
राज्याच्या राजकारणातही महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात आहे.

Comments
Post a Comment